बुलढाणा: पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले दर्शन
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मनोभावे दर्शन घेतले. या पवित्र दिवशी सर्वांच्या जीवनात सुख,शांती,समृद्धी आणि आरोग्य नांदो,असे विठुरायाचरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी साकडं घातलं.