आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,बीड येथे आज दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी आरोग्य सहाय्यक यांच्या आढावा बैठकीत ध्यान धारणा सत्र घेण्यात आले. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार इत्यादी आजारांचा वाढता प्रादुर्भाव, अतिथंडी आणि अतिउष्णतामान असे हवामानात अनपेक्षित बदल होत असल्याने हृदय विकार वाढलेले आहेत. या सत्रात ध्यान धारणा अंतर्गत प्रामुख्याने ओंकार आणि आनापान प्रामुख्याने घेण्यात आले.