कवठे महांकाळ: तासगाव-कवठेमहांकाळ रस्त्यांसाठी 30 कोटींहून अधिक निधी मंजूर
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 30 कोटी 32 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तासगावसाठी 9.50 कोटी तर कवठेमहांकाळसाठी 20.82 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे.