वर्धा: देवळी–पुलगाव मतदारसंघात २५ वर्षांनंतर विकासकामांना गती:पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध, कामांना सुरुवात:आ.राजेश बकाने
Wardha, Wardha | Jan 21, 2026 देवळी–पुलगाव मतदारसंघामध्ये मागील २५ वर्षांपासून रस्त्यांचे काम झाले नव्हते. या मतदारसंघामध्ये विकास कोसो दूर होता. त्यामुळे या ठिकाणी काम करत असताना अनेक ठिकाणी अडचणी येत होत्या. मात्र, त्या अडचणींना तोंड देत आणि त्यांना समोर जाऊन आता या ठिकाणी विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत.या ठिकाणी पूल असो किंवा रस्ते असोत, त्यासाठी नाबार्डकडूनही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचेही भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच त्या कामांनाही सुरुवात होणार असल्याचे आमदार राजेश बकाने म्हणाले.