लातूर: यशवंतवाडी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम; १० शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे लातूरच्या संवाद कार्यालयासमोर वितरण
Latur, Latur | Nov 5, 2025 लातूर -गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते प्रवासाची कसलीही सुविधा नसल्याची अडचण लक्षात घेऊन रेणापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दहा शालेय विद्यार्थ्यांना भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल यशवंतवाडी ग्रामपंचायतचे अनेकांनी कौतुक केले आहे..