आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे कचारगड येथे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थळ असून विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने कचारगड येथे येतात यावर्षीची यात्रा दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत आहे या पाच दिवशीय यात्रेत भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आज दिनांक 13 जानेवारी रोजी कचारगड येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निर्देश दिले कचारगड येथे सगा मांदी ठिया सभागृहात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेसंदर्भात