निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाचरण केले जाते. 19 व 20 जून रोजी या टीमने पुराच्या पाण्यातून लोकांचे जीव वाचविले. या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी समजून आपले कर्तव्य पार पडतात.त्यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुक होत असताना गुरुवारी रोह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना पुराच्या पाण्यातून सूरक्षित स्थळी सोडण्याचे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केल्याने या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.