परतूर: घरातील नोकराने सोन्याची साखळी घेऊन ठोकली होती धूम,परतुर पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीत ठोकल्या बेड्या
Partur, Jalna | Apr 22, 2026 आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार परतुर पोलीस ठाण्यातील डहाळे नगर येथे 16 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी राजे जगन्नाथ डहाळे यांनी फिर्यादी दिली की त्यांच्या घरातील सोन्याची साखळी चोरीला गेली आहे ,या फिर्यादीवरून शोध घेतला असता त्यांच्या घरातील नोकर राहुल राजेभाऊ गायकवाड हा चोर असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 20 एप्रिल रोजी साखळी ताब्यात घेतली असून 3लाख50 हजाराचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.