महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे द्वितीय गुणपत्रक, प्रमाणपत्र हे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिफारसीसह मंडळ कार्यालयात ऑनलाईन चलनाचा भरणा करुन देण्यात येत होते. तथापी द्वितीय गुणपत्र, प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र देण्यासाठी 19 नोव्हेंबर पासुन मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावरऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाच्या