नागपूर शहर: वाजपेयी नगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; कलमना परिसरात खळबळ
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगर भागात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मोहम्मद जोहरान मुस्तफा शेख असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जोहरान हा केटरिंगच्या कामाशी संबंधित होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र याच कारणावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता.