रोहा: रोहा एस टी स्टॅंडमध्ये दीड फूट मोठा खड्डा, एसटीचे होतेय रोज आर्थिक नुकसान
Roha, Raigad | Jun 25, 2025 रोहा एस. टी. स्टॅंड परिसरात नगरपरिषद कडून येताना गाड्या आतमध्ये प्रवेश करतात त्या प्रवेशद्वाराजवळच तब्बल दीड फूट मोठा खड्डा पडला आहे. रोहा आगार प्रमुख या खड्ड्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. 24 जून मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही भयानक स्थिती पहायला मिळाली. एस. टी. ज्यावेळी आतमध्ये प्रवेश करते तेव्हा प्रवाश्यांना सुद्धा या खड्ड्याची जाणीव गाडीत होते. गाडीतील प्रवाश्यांना नाहक त्रास होत आहे.दररोज या खड्ड्यात कित्येक गाड्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.