नागपूर शहर: क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक;आरोपी ताब्यात : अतुल मोहनकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट - 3 चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांनी 11 जुलैला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,'बायनान्स' ॲपद्वारे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १७,३२,६१२ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी नागपूर गुन्हे शाखा युनिट-३ आणि सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत मुख्य आरोपी पार्थ सरकार याला पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून अटक केली आहे. या रॅकेटमध्ये मोठे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तप