परळी: नागपिंपरी येथे शेतात लागवड केलेला २१ किलो गांजा पोलिसांनी पकडला
Parli, Beed | Nov 15, 2024 कापूस व तुरीच्या शेतात, गांजा लागवड केल्याची गुप्त माहिती. पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकून 21 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई परळी तालुक्यातील नागपिंपरी येथे गुरुवार दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आली. विश्वास नामदेव बडे असे गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील कारवाई दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड , तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पडवळ यांनी केली.