अंबड: सकल जैन समाजाची अंबडमध्ये भव्य मिरवणूक; महावीर जयंती उत्साहात साजरी
Ambad, Jalna | Mar 31, 2026 सकल जैन समाजाची अंबडमध्ये भव्य मिरवणूक; महावीर जयंती उत्साहात साजरी सकल जैन समाजातर्फे अंबड शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य व दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून पार पडलेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही मिरवणूक महावीर मंदिर येथून प्रारंभ होऊन मेहेरबाबा मंदिर मार्गे नात्रेकर चौकात पोहोचली. त्यानंतर चंद्रप्रभू मंदिर मार्गे शांतिनाथ मंदिर येथे आगमन झाले व पुढे मंदिर परिसरात पोहोचली. मंदिरात भगवान महावीर यांचा विधिव