एरंडोल तालुक्यात उत्राण हे गाव आहे. या गावाच्या शिवारात गिरणा नदी आहे. त्या गिरणा नदीमध्ये पोहण्यासाठी बुधा लालचंद भिल वय ५० हा इसम गेला होता. दरम्यान खोल पाण्यात तो बुडाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.