धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील एका शेतकरी कुटुंबावर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे. संबंधित शेतकरी कुटुंबातील व्यक्तीच्या घराची कर्ज वसुलीसाठी एका स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून बँकेचे अधिकारी वसुलीसाठी सातत्याने तगादा लावत आहेत. या संवेदनशील घटनेची गांभीर्याने दखल घेत आज माजी मंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी तातडीने बँक प्रशासनाच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि कडक शब्दांत सूचना दिल्या.
#TanajiSawant #dharashiv #शेतकरी #LatestNews Tanaji Sawant - तानाजी सावंत
Dharashiv, Dharavshiv | Oct 30, 2026