तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या षोडसी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.