पालघर: मनोर-वाडा मार्गावर टेननाका परिसरात टेम्पोचा अपघात, चालक किरकोळ जखमी
पालघर जिल्ह्यातील मनोर- वाडा मार्गावर टेम्पोचा अपघात घडला आहे मनोर- वाडा मार्गावरून जात असलेल्या टेम्पो चालकाला रात्रीच्या अंधारात रस्त्यात असलेल्या सिमेंटच्या दुभाजकांचा अंदाज न आला नाही. यामुळे टेम्पो थेट सिमेंट दुभाजकांवर आदळला. टेननाका परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही