कल्याण: टेम्पो चालकाकडून पोलीस चौकीची तोडफोड, वाहतूक पोलिसाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल
Kalyan, Thane | Oct 31, 2025 कल्याणच्या चक्की नाका परिसरा मधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एका टेम्पो चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. कारवाई का केली असे म्हणत पोलीस चौकीची तोडफोड केली वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. जवळपास तासभर पोलीस चौकी परिसरात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाने धुमाकूळ घातला होता. सर्व प्रकार एका मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.