समुद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पुर्व संध्येवर समुद्रपुर पोलिसांची निंबा येथिल जंगल शिवारात अवैध दारू विरोधात मोठी कारवाई
समुद्रपुर पोलिसांनी २५ एप्रिलला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास निंबा शिवारील जंगलात परीसरात अवैध दारू वर मोठी कारवाई केली. झुडपात लपवून ठेवलेला तब्बल ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी आरोपी शालिक बारसकर व मुलगा वैभव बारसकर हे फरार झाले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर यांनी सहकाऱ्यांसह केली.