समुद्रपूर: केसलापार येथे वाघाच्या हल्लात गाय ठार: शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान
केसलापार येथिल शेतकरी संजय बांगरे यांच्या शेतात बांधून असलेल्या गायीवर वाघाने हल्ला ठार केल्याची घटना आज बुधवारी २४ एप्रिलला सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार केसलापार येथिल शेतकरी संजय बांगरे यांच्या शेतात त्यांचे जनावरे बांधून होती यावेळी रात्री १ वाजताच्या सुमारास वाघाने याठिकाणी येऊन यातील एका गायीवर हल्ला चढवून गायीला ठार केले.सकाळी शेतकरी शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आली आहे.