गोंदिया: जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांचे निर्देश
Gondiya, Gondia | Mar 10, 2025 जलयुक्त शिवार अभियान शासनाच्या वतीने सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानथम, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, देवरीचे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड आदी उपस्थित होते.