टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या वृत्तानंतर खळबळ! पुणे पोलीस आयुक्तांची चौकशीचे संकेत?
पुणे पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या सुमारे 1700 जवानांकडून किटच्या नावाखाली प्रत्येकी ₹21 हजार रुपये मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे काही संदेश समोर आले असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकृत स्तरावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भरती प्रक्रियेनंतर प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणांकडून अशा प्रक�
Pune City, Pune | Jun 10, 2026