Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
image
image

25 लाखांचे हरवलेले सोन्याचे दागिने अवघ्या काही तासांत शोधून कुटुंबाच्या स्वाधीन. राजापेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 01/07/2026 रोजी फिर्यादी गजानन अंबर वर्धे (रा. साईनगर, अमरावती) यांनी तक्रार दिली की, पत्नीच्या उपचारासाठी हैदराबाद येथे जाताना त्यांनी 140 ते 150 ग्रॅम वजनाचे अंदाजे ₹25 लाख किमतीचे सोन्याचे दागिने लाल रंगाच्या बॅगेत ठेवले होते. उपचारादरम्यान पत्नीचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर कुटुंब अमरावतीला परतले. अंत्यविधीनंतर बॅग तपासली असता ती आढळून आली नाही. त्यामध्ये ठेवलेले सुमारे ₹25 लाखांचे सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारीची गंभीर दखल घेत राजापेठ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. फिर्यादीसोबत विशेष पथक हैदराबाद व आदिलाबाद येथे रवाना करण्यात आले. रुग्णालये, प्रवासाचा मार्ग आणि 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान हैदराबाद-आदिलाबाद मार्गावरील जनता रेस्टॉरंट येथे फिर्यादींची लाल रंगाची बॅग शोधून काढण्यात आली. बॅगेतील 140 ते 150 ग्रॅम वजनाचे अंदाजे ₹25 लाखांचे सोन्याचे दागिने तसेच सर्व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित अवस्थेत मिळून आली. तक्रारीची गंभीर दखल घेत राजापेठ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. विशेष पथकाने हैदराबाद व आदिलाबाद येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान जनता रेस्टॉरंट परिसरातून फिर्यादींची लाल रंगाची बॅग शोधून काढत अंदाजे ₹25 लाखांचे सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितरित्या हस्तगत करून फिर्यादींना परत करण्यात आली. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. Maharashtra Police Headquarter #AmravatiCItyPolice #rajapethpolice

177 views | Amravati, Maharashtra | Jul 4, 2026