जालना: बारवाले महाविद्यालयासमोर विद्यार्थिनीची छेड, महाविद्यालयासमोर राडा; मारहाणीत काही जण जखमी
Jalna, Jalna | Jul 10, 2026 बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयासमोर महाविद्यालयात जाणार्या एका विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या आरोपानंतर मोठा राडा झाल्याची घटना आज सकाळी घडली. छेडछाडीच्या कथित प्रकारानंतर संबंधित विद्यार्थिनीने आपल्या ओळखीच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिली, त्यानंती तीने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली. शुक्रवार दि. 10 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आलेल्या काही जणांनी छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्यांनी केला आहे.