65 वर्षानंतर हा योग येत आहे कार्यक्रमाचे मिनिट टू मिनिट पळणार आहे महापौर हिमगौरी आडके यांची प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्
Nashik, Nashik | Oct 23, 2026 नाशिक हिमगौरी आडके महापौर byte points - महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. - कुंभमेळा मंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. - *कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राष्ट्रपतींसोबत चर्चा करण्यात आली.* - तब्बल ६५ वर्षांनंतर यंदा त्रिखंडी हा अनोखा योग जुळून आला आहे. - कुंभमेळा ध्वजारोहण पार्श्वभूमीवर शंखनाद आणि गोदा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. - *ध्वजारोहणाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे* - *ध्वजारोहण सोहळ्याला विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे*. - कला क्षेत्रातील काही मान्यवरही ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. - २५ ऑक्टोबर रोजी शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. - कुंभमेळा परिसरात मद्य आणि मांसविक्री बंद ठेवता येईल का, याबाबत विचार सुरू आहे - मांसविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल का, याबाबतही चर्चा सुरू आहे. - कुंभमेळ्याच्या कामांसाठी ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. - बांधकामाच्या ठिकाणी धूर आणि धूळ जास्त प्रमाणात पसरू नये, यासाठी पाण्याची फवारणी करण्याचा विचार सुरू आहे.