Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत एका आरोपीला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक गस्त घालत होते. दरम्यान, दि. १२ जून २०२६ रोजी येरमाळा चौक परिसरात पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. झगडे गल्ली, भूम, ता. भूम, जि. धाराशिव) हा आंदोरा येथे पंचायतसाठी आला असून हॉटेल निसर्गसमोर थांबलेला आहे. तसेच त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांना कळविल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हॉटेल निसर्गसमोर संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला खोवलेला लाकडी पिस्टल ग्रीप असलेला लोखंडी गावठी कट्टा आणि पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर तसेच रोहित दंडनाईक यांच्या पथकाने पार पाडली. अवैध शस्त्रधारकांविरोधातील ही कारवाई जिल्हा पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधी मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. #DharashivPolice #LocalCrimeBranch #KalambPolice #IllegalWeapons #CountryMadePistol #PoliceAction #OsmanabadNews #VeerMaharashtraNews #CrimeNews #MaharashtraPolice #Dharashiv #BreakingNews #LawAndOrder #PoliceSuccess #Andora #Bhum #yermala

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026