Hingoli News: हिंगोली येथील भाजपच्या आढावा बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्ष विकासाचे मुद्दे नसल्याने जाणीवपूर्वक 'फेक नरेटिव्ह' तयार करून दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या अपप्रचाराला तथ्यांच्या आधारे चोख उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सक्रिय होऊन केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
.
#hingoli #hingolidistrict #hingolinews #bjpmaharashtra #iblisnews