
दुष्काळात ५ हजाराचं चॉकलेट देऊन बळीराजाची थट्टा थांबवा; अन्यथा लोक मंत्र्यांना गावात फिरू देणार नाहीत - रोहित पवारांचा सरकारला इशारा
मुंबई:महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या तुटपुंज्या मदतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत रोहित पवार म्हणाले, "दुष्काळाच्या आगीत शेतकरी होरपळून निघत असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपये, तर शेतमजुरांना २५,००० रुपये मदत देण्याची आमची मागणी आहे. पण सरकारने अग्रीम रक्कम म्हणून केवळ ५,००० रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण केली. नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या एका चहापानाचा खर्चही यापेक्षा कितीतरी मोठा आहे… आज शेतीचा मशागत खर्चच हेक्टरी ३० ते ५० हजार रुपयांवर गेलाय आणि अशा परिस्थितीत जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी करणारं हे सरकार ५ हजार रुपयांचं चॉकलेट शेतकऱ्यांच्या हातावर टेकवत असेल, तर अन्नदात्याची अशी चेष्टा करताना सरकारला लाज कशी वाटत नाही? हा बळीराजाचा केवळ अपमानच नाही, तर त्याच्या परिस्थितीची क्रूर थट्टा आहे! सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून हेक्टरी १ लाख रुपयांपैकी अग्रीम रक्कम म्हणून ३० ते ३५ हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपयांपैकी अग्रीम रक्कम म्हणून १० हजार रुपये द्यावेत. अन्यथा, लोक नेत्यांना आणि मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत आणि गावातही फिरू देणार नाहीत..!"
#दुष्काळग्रस्त_शेतकरी #शेतकरी_मदत #बळीराजा #महाराष्ट्रातील_दुष्काळ #FarmersFirst #MaharashtraDrought #RohitPawar #NCP #MaharashtraGovernment #PrimeLiveNews
Latur, Latur | Oct 20, 2026