
अमरावती गुन्हे शाखेची तातडीची कारवाई | प्राणघातक हल्ल्यातील दोन आरोपी काही तासांत ताब्यात
दि. 12/07/2026 रोजी फिर्यादी नितेश रमेशराव तायवाडे (वय 45 वर्ष) यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानुसार 11/07/2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नवसारी चौक परिसरात किरकोळ वादातून दोन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून फिर्यादीला गंभीर जखमी केले व दोघेही घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच अमरावती शहर गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त माहिती, तांत्रिक तपास व सापळा रचून अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.
तपासादरम्यान आरोपींपैकी एक हा नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
👤 सय्यद सोहेल उर्फ फज्जू सय्यद गफ्फार (वय 28 वर्ष)
रा. पाण्याची टाकीजवळ, अन्सार नगर, अमरावती
👤 अब्दुल जरीब उर्फ शाहरुख अब्दुल शरीफ (वय 32 वर्ष)
रा. रतनगंज, गवळीपुरा, अमरावती
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) श्री. यशवंत सोळंके, मा. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्रांजली सोनवणे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कैलास पुंडकर तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गाडगेनगर विभाग) श्री. निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
#AmravatiCItyPolice
#CrimeControl