मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात
अलोरे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीकडून सुरू होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
तपासादरम्यान या गुन्ह्यातील तीन आरोपींना सांगली येथून ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ₹1,08,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. CMOMaharashtra Devendra Fadnaviss Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice