हिंगोली (औंढा नागनाथ):चिंचोळी निळोबा येथील सुंदरराव मोरे याने पैशांच्या बदल्यात एका तक्रारदाराची जमीन स्वतःच्या नावे करून घेतली आणि नंतर ती परत करण्यास नकार दिला. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ७ वाजता मोरे याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ११ खरेदीखतं, ९ कोरे बाँड, ३ बाँडवरील खरेदीखतं आणि पैशांच्या व्यवहाराच्या ५ चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
.
#hingolinews #aundhanagnath #chincholiniloba #IllegalMoneyLending #iblisnews