महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आणि आपण दांडियाच्या तालात?
एकीकडे माझा बळीराजा पुढचे ८ महिने कसे जगायचे या चिंतेत आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, शेतमजुराच्या घरात चूल पेटायची पंचाईत.आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून दांडियाचे इव्हेंट, डीजे, लाईटिंग...सण-उत्सव जरूर साजरे करा, पण भान पण ठेवा. आजची परिस्थिती भीषण आहे हे विसरून चालणार नाही.उत्सवाच्या नावाखाली चाललेला हा दिखावा थांबवून, तोच पैसा एखाद्या गरजू शेतकऱ्याच्या मदतीला लावला तर खरा उत्सव साजरा होईल.गोरगरीबांनी सण कसे साजरे करायचे? याचा तरी विचार करा.
#महाराष्ट्रदुष्काळ #शेतकरी #विचार करा
Latur, Latur | Oct 20, 2026