
अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई | घातक शस्त्रांसह २ आरोपी ताब्यात, मोठा गुन्हा रोखला
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या निर्देशानुसार अमरावती शहरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका ठिकाणी छापा टाकून दोन आरोपींना घातक शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून 2 लोखंडी तलवारी, 2 चायना चाकू आणि 1 लोखंडी चाकू असा एकूण ₹7,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेळेत कारवाई झाल्याने संभाव्य गंभीर गुन्हा टळला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
👤 अमित साहेबराव तंतरपाळे (वय 19 वर्ष)
रा. अशोक नगर, अमरावती
👤 अभिषेक भीमराव खडसे (वय 25 वर्ष)
रा. अशोक नगर, अमरावती
जप्त मुद्देमाल :
🔸 2 लोखंडी तलवारी – ₹4,000/-
🔸 2 चायना चाकू – ₹2,000/-
🔸 1 लोखंडी चाकू – ₹1,000/-
💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹7,000/-
आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) श्री. यशवंत सोळंके, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्री. श्याम घुगे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अतुल वर यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
#AmravatiCItyPolice
#CrimeControl