Hingoli news : हिंगोलीत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. 'कोटपा कायदा २००३' अंतर्गत पंचायत समितीच्या १४ कर्मचाऱ्यांकडून २,८०० रुपये आणि जिल्हा परिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांकडून ६०० रुपये, असा एकूण ३,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार ही मोहीम तीव्र केली असून, शासकीय आवारात कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थ आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढेही अशी आकस्मिक तपासणी सुरूच राहील.
.
#tobaccofree #hingolinews #hingoli #RahulGupta #iblisnews