
अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई | ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर धाड, ₹1.66 लाखांचा मुद्देमाल जप्त
दिनांक 10/07/2026 रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-2 ने गुप्त माहितीच्या आधारे यशोदा नगर नं. 1 येथील "अरमान ट्रेडर्स" दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली.
छापेमारीदरम्यान "Fun Target" व "Golden Chance" या ऑनलाइन गेमिंग वेबसाइटद्वारे पैशांची देवाण-घेवाण करून अवैधरित्या जुगार खेळविला जात असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी 2 जण जुगार चालवत तर 3 जण जुगार खेळताना आढळून आले.
कारवाईत एकूण 5 आरोपींना ताब्यात घेऊन रोख रक्कम, ऑनलाइन जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन असा ₹1,66,610/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
अरमान संतोष पाल (21) – यशोदा नगर, अमरावती
संतोष रघुनाथ पाल (45) – यशोदा नगर, अमरावती
सुमित अवधूत खिराडे (33) – बेनोडा, अमरावती
यश पुरुषोत्तम लाडूकर (22) – किरण नगर, अमरावती
सतीश प्रकाश पोजगे (30) – यावली शहीद, तिवसा, जि. अमरावती
आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) श्री. यशवंत सोळंके, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्री. श्याम घुगे तथा मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे व मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अतुल वर यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
#AmravatiCItyPolice
#CrimeControl