📍अहमदपूरमध्ये शेतकरी आत्महत्येची चौथी घटना; कर्जाचा ताण आणि दुष्काळाने शेतकरी हतबल!
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची चौथी घटना समोर आली आहे. शिंदगी बुद्रुक येथील अरविंद नागनाथ बंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दुष्काळामुळे सोयाबीनचे नुकसान, पाण्याअभावी उसाचे संकट आणि डोक्यावर कर्जाचा बोजा, अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाला आहे. पाच हजार रुपयांची अग्रीम मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
एकीकडे शेतकऱ्यांना मदतीची आश्वासने, तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच! शेतकऱ्यांना ठोस मदत कधी मिळणार आणि कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र न्यूज — शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज!
Latur, Latur | Oct 21, 2026