
रत्नागिरी पोलीसांकडून खेड तालुक्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २ तासांत उलगडा
खेड तालुक्यात दापोलीहून खेडकडे येण्यासाठी एका इसमाने प्रवासासाठी चारचाकी वाहनास हात दाखवून थांबविले. कुवे घाट परिसरात पोहोचल्यानंतर वाहनातील दोन व्यक्तींनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या मोबाईलद्वारे जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेतले. त्यानंतर पीडित इसमाला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॅप्पी ढाबा परिसरात उतरवून आरोपी पसार झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, खेड श्री. विवेक अहिरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या २ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद केले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #ratnagiripolice