
आकाशवाणीच्या 'युवा कट्टा' मध्ये हावगीस्वामी महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांचा सहभाग
उदगीर (प्रतिनिधी) -भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या लोकप्रिय 'युवा कट्टा' या कार्यक्रमात श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आपले विचार, काव्यवाचन आणि समकालीन प्रश्नांवर मते व्यक्त केली. ग्रामीण भागातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव दिल्याबद्दल महाविद्यालयाने केंद्र संचालक सदानंद कामडी आणि निवेदिका सुमेधा कुलकर्णी यांचे आभार मानले.
यामध्ये संस्कार मठपती, पृथ्वीराज पाचपिंडे, वैभवी वारद, श्रद्धा मजगे, स्वराली पाटील, प्रथमेश भारती, महादेव सूर्यवंशी, प्रियांका पाटील, श्रद्धा भालेराव, सादिया आत्तार, क्षितिजा नळगीरे, राधिका बिरादार आणि मयुरी गोताळे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना मराठी विभागातील डॉ. म. ई. तंगावार यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम दि. १८ ऑक्टोबर आणि ०१, ०८, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रविवारी सकाळी ११:०५ वाजता आकाशवाणी परभणी केंद्रावर चार भागात प्रसारित होणार आहे. श्रोत्यांनी NEWSONAIR ॲपवरून कार्यक्रम ऐकावा.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर, सचिव डॉ. मनीषा वडियार, प्राचार्य डॉ. एन. जी. एमेकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Latur, Latur | Oct 14, 2026