Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

इन्स्टाग्रामवर प्राणघातक शस्त्रासह फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर राजापेठ पोलिसांची कारवाई. दिनांक 08/07/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांना एका युवकाने प्राणघातक चाकूसह इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करून समाजात दहशत निर्माण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राजापेठ डी.बी. पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे मांडवा झोपडपट्टी, दसरा मैदान, अमरावती येथून आरोपी संकेत उमेश वानखेडे (वय 21 वर्ष, रा. दसरा मैदान, अमरावती) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 13.8 इंच लांबीचा स्टीलचा चाकू (किंमत अंदाजे ₹2,000/-) जप्त करण्यात आला. सदर आरोपी प्राणघातक शस्त्रासह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशन येथे कलम 4/25 शस्त्र अधिनियम तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व राजापेठ डी.बी. पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. #amravaticItypolice #crimecontrol #rajapethpolice

Amravati, Maharashtra | Jul 8, 2026