
"Operation TAPE For Safe" अभियानांतर्गत अवजड वाहनचालकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे सक्त आदेश
रस्ते अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे "Operation TAPE For Safe" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी जिल्ह्यातील सर्व ट्रक, बस, ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहन चालकांना वाहनावरील टेल लाईट, ब्रेक लाईट, पार्किंग/हॅझर्ड लाईट व रिफ्लेक्टर कार्यरत व सुस्थितीत ठेवण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
रात्रीच्या वेळी वाहन बंद पडल्यास किंवा रस्त्यावर उभे असल्यास कार्यरत दिवे व रिफ्लेक्टरमुळे ते वाहन दूरवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना वेळेत इशारा मिळून गंभीर अपघात टाळण्यास मोठी मदत होते. सर्व अवजड वाहन चालक व मालकांनी वाहनावरील सुरक्षा उपकरणांची नियमित तपासणी करून ती कायम कार्यरत ठेवावीत, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #roadsafety #ratnagiri #safedrivingforlife #ratnagiripolice