
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर येथे ‘Zero Fatality District (ZFD)’ रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 09/07/2026 रोजी डॉ. सी.व्ही. रमण हॉल, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे Zero Fatality District (ZFD) अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करून ‘Zero Fatality’ साध्य करणे हा होता.
कार्यशाळेत SaveLIFE Foundation च्या तज्ज्ञांनी गंभीर अपघातांचे विश्लेषण, अपघातांची कारणे, ब्लॅक स्पॉट्स ओळखणे, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच दारू पिऊन वाहन चालविणे, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आणि महामार्गावर जड वाहने उभी करणे यांसारख्या नियमभंगांवर कठोर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले.
याशिवाय, अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी पोलीस, आरोग्य व इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष सादरीकरण (Presentation), गटचर्चा आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पोलीस घटकांतील वरिष्ठ अधिकारी, Critical Corridor Team व महामार्ग पोलीस दलाचे मिळून 130 पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
शेवटी, वाहतूक विभाग, अमरावती शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
@dgpmaharashtra
#AmravatiCItyPolice
#ZFD