
रत्नागिरी पोलीस दलाच्या 'मिशन ग्राम सुरक्षा' अभियानास लांजा येथील नागरिकांची साथ
लांजा बस स्थानक परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या "मिशन ग्राम सुरक्षा" अंतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. सौरभ कवचे यांनी लांजा बस स्थानक परिसरात दोन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सहकार्याबद्दल रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे व त्यांच्या पथकाच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना "मिशन ग्राम सुरक्षा" अंतर्गत आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #safe #village #ratnagiripolice