
दिनांक 04/07/2026 रोजी रात्री गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विद्याभारती कॉलेजजवळ एका इसमाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती मिळताच अमरावती शहर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात मृतकाची ओळख जायेद हुसेन खान (वय 28 वर्ष, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) अशी पटली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला.
अवघ्या दोन तासांत आरोपींचा शोध घेत शहरभर पाठलाग करून बडनेरा वाय-पॉईंट येथून चारचाकी वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
शेख इमरान शेख महमूद उर्फ गोलू कुरेशी (वय 30 वर्ष)
शेख समीर शेख जुम्मन (वय 32 वर्ष)
शेख अमीन शेख जब्बार (वय 34 वर्ष)
प्राथमिक चौकशीत आपसातील वादातून धारदार चाकूने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तसेच मुख्य आरोपी शेख इमरान उर्फ गोलू कुरेशी याच्याविरुद्ध यापूर्वीही यवतमाळ येथे खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदर कारवाई
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त श्री. यशवंत सोळंके, मा. पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कैलास पुंडकर तथा मा. सहायक पोलीस आयुक्त, गाडगेनगर विभाग श्री. निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल वर व श्री. दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
@dgpmaharashtra
#amravaticitypolice
#crimecontrol