
अमरावती शहरात 24 जुलैपासून दुचाकी चालक व मागील प्रवाशांसाठी हेल्मेट सक्ती
अमरावती शहरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दि. 24/07/2026 पासून दुचाकी चालक तसेच मागील प्रवाशांना (Pillion Rider) ISI प्रमाणित हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे.
सन 2024 मध्ये 454, 2025 मध्ये 417 आणि 01 जानेवारी ते 30 जून 2026 या कालावधीत 210 रस्ते अपघात नोंदविण्यात आले असून, त्यापैकी सुमारे 60% अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. हेल्मेट न वापरल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने वाहतूक विभाग, अमरावती शहर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालक व मागील प्रवाशांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येऊ शकते.
🚦 वाहतूक विभाग, अमरावती शहर यांचे नागरिकांना आवाहन :
"सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार!"
हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचे कवच आहे. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा नियमित वापर करावा आणि या जनजागृती मोहिमेला सहकार्य करावे.
#AmravatiTrafficPolice