Hingoli News : सेनगाव येथील शासकीय गोदामात ठाकरे गटाने केलेल्या पाहणीत गव्हामध्ये किडे आणि तांदूळ चुरी झालेला आढळला. सुमारे ४ हजार क्विंटल गहू आणि ३ हजार क्विंटल तांदूळ साठवलेल्या या गोदामातील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जनावरांना खाण्याच्या लायकीचेही नाही, असा संताप जिल्हाप्रमुख संदेश देशमुखांनी व्यक्त केला. याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
.
#sengaon #hingoli #hingolinews #sandeshdeshmukh #iblisnews