
रत्नागिरी पोलीस दलाकडून एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारा सराईत आरोपीस अटक,३४ विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेची हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.तपासादरम्यान आरोपीचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेण्यात आला. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी हा मंडवी, रत्नागिरी परिसरात आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून ३४ विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice