नागपूर शहर: हृदयद्रावक! नागपुरात मायलेकीची आत्महत्या, नंदनवन पोलिसांचा तपास सुरु : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 1 मेला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार नंदनवन परिसरात एका सधन कुटुंबातील आई आणि मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच या धक्कादायक प्रकरणाचा खुलास