कराड: कराड तालुक्यात कार्वे गावानजीक कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून महिला जागीच ठार; कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद
Karad, Satara | Oct 14, 2025 पुणे मिरज रेल्वे मार्गावर कराड तालुक्यातील कार्वे गावानजीक असलेल्या कोरेगाव गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसून शालन संभाजी थोरात या साठ वर्षात महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कार्वे गावानजीक मध्य रेल्वेने रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण केले आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला कार्वे आणि कोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.