नागपूर शहर: नागपुरात खळबळजनक घटना: बांधकाम साईटवर दुसऱ्या माळ्यावरून पडून ६ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा बांधकाम साईटवरील दुसऱ्या माळ्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राशी मनोज नेवारे वय ६ वर्ष असे मृत बालिकेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. इमामवाडा येथील सरदार वल्लभभाई पटेल चौकात सचिन वसंतराव गुढधे यांची एक बांधकाम साईट सुरू आहे.